अन् मुस्लिम महिलेनं मुलाचं नाव ठेवलं नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमधल्या गोंडा इथे राहणाऱ्या एका मुस्लिम महिलेनं आपल्या नवजात बालकाचं नाव नरेंद्र मोदी ठेवलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशी मिनाज बेगन यांनी मुलाला जन्म दिला. २३ मे रोजी मोदी पुन्हा एकदा बहुमातानं निवडून आले याचाच आनंद साजरा करताना मिनाज यांनी आपल्या मुलाचं नाव मोदी असं ठेवलं. मी २३ मे रोजी बाळाला जन्म दिला. मुलाच्या जन्माची बातमी सांगण्यासाठी मी माझ्या पतीला फोन केला होता. ते कामानिमित्त दुबईला असतात. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर मोदी जिंकले का? असा पहिला प्रश्न त्यांनी मला विचारला. तेव्हाच मी माझ्या मुलाचं नाव नरेंद्र मोदी ठेवण्याचं पक्क केल्याचं मिनाज एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या . माझ्या मुलानं देखील मोदींसारखी चांगली कामं करून यशस्वी व्हावं अशी माझी इच्छा आहे म्हणूनच मी त्याचं नाव नरेंद्र मोदी ठेवण्याचं निश्चित केलं असल्याचं त्या म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीचे निकाल दोन दिवसांपूर्वीच जाहीर झाले यावेळी मोदी अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप ...